Ladki bahin Yojana: ६५ लाख अपात्र महिलांकडून पैसे परत घेण्याची प्रक्रिया सुरू; सरकार उचलणार कठोर पाऊल

तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटतात का नाही?

नक्की तुमचं मत मांडा

Batmi care

मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने आता या योजनेतील अपात्र लाभार्थ्यांविरुद्ध कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पडताळणी प्रक्रियेदरम्यान सुमारे ६५ लाख लाभार्थी अपात्र ठरले असून, त्यांच्याकडून आतापर्यंत दिलेले पैसे परत घेण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे .

पडताळणीमुळे हप्ते लांबणीवर

या मोठ्या प्रमाणावरील पडताळणी प्रक्रियेमुळे मार्च आणि एप्रिल महिन्यांचे हप्ते अद्याप महिलांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मे अखेर किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला थकीत हप्ते एकत्र दिले जाण्याची शक्यता आहे

पैसे वसुलीचे सरकारचे उद्दिष्ट

ज्या महिलांनी चुकीची माहिती देऊन किंवा अपात्र असतानाही या योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांच्याकडून शक्य त्या मार्गाने रक्कम वसूल करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. या योजनेचा लाभ फक्त गरजू आणि पात्र महिलांनाच मिळावा, यासाठी ही तपास मोहीम राबवण्यात येत आहे .

अपात्रतेची कारणे

योजनेच्या अंमलबजावणीनंतर करण्यात आलेल्या पडताळणीत असे आढळून आले की, अनेक सरकारी नोकरी करणाऱ्या महिला किंवा आर्थिक निकषात न बसणाऱ्या व्यक्तींनीही अर्ज केले होते. आता अशा ६५ लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आले असून त्यांच्याकडून वसुलीची तयारी सुरू झाली आहे .

Leave a comment