लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी; डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता संक्रांतीपूर्वी जमा होण्याची शक्यता
मुंबई | प्रतिनिधी – बातमी केअर 27
महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक दिलासादायक आणि महत्वाची बातमी समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता संक्रांतीपूर्वी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील लाखो महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते. काही महिलांना मागील महिन्याचा हप्ता वेळेवर न मिळाल्याने संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आता योजनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून दोन महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे जमा होण्याचे संकेत मिळत आहेत
संक्रांतीपूर्वी पैसे येणार?
सध्या उपलब्ध माहितीनुसार, डिसेंबर व जानेवारी महिन्याचा हप्ता संक्रांतीपूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अंतिम तारीख अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल.
महत्वाची सूचना
लाभार्थी महिलांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. फक्त अधिकृत माहितीवरच अवलंबून राहावे. पैसे जमा होण्यास काही ठिकाणी थोडा विलंब होऊ शकतो.

Batmti Care 27

