ताज्या घडामोडी बातमी केअर
political newsViral newsलाडकी बहीण योजना सरकारी योजना ताज्या बातम्या शेती बातम्या व्हायरल व्हिडिओ राजकीय बातम्याशेती

लाडकी बहिण योजना :  केवायसी चुकली तर हे काम करा पैसे जमा होतील

बातमी केअर महाराष्ट्र

लाडकी बहीण योजना

महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तसेच त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राबवली जात आहे. या योजनेचा लाभ नियमितपणे आणि पात्र लाभार्थींनाच मिळावा, यासाठी शासनाकडून महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे.
योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थी महिलांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत e-KYC पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, काही लाभार्थींनी e-KYC प्रक्रियेदरम्यान चुकीचा पर्याय निवडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे काही प्रकरणांमध्ये पात्र असूनही लाभ अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
क्षेत्रीय पातळीवर प्रत्यक्ष पडताळणीचे आदेश
या पार्श्वभूमीवर शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, योजनेच्या निकषांनुसार संबंधित लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification) करण्यात येणार आहे. ही पडताळणी अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत केली जाणार असून, याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
लाभार्थींना काय करावे लागेल?
अंगणवाडी सेविका संपर्क साधल्यास आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत
आधार, रेशन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे तपासणीसाठी तयार ठेवावीत
अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीस प्राधान्य द्यावे
शासनाच्या या निर्णयामुळे चुकीमुळे अडचणीत सापडलेल्या पात्र लाभार्थींना दिलासा मिळणार असून, योजनेचा लाभ योग्य महिलांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.
अधिकृत अपडेटसाठी आमच्या वेबसाइटला भेट देत रहा

Batmicare27

मी एक युट्युब बर आहे त्यासोबत मीच एक फेसबुक पेज आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *