लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार? महिलांसाठी आजची मोठी अपडेट
लाडकी बहीण योजना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता
राज्यातील लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्याप अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही तांत्रिक कारणांमुळे हप्ता उशिरा होत आहे. मात्र संबंधित विभागाकडून लवकरच हा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. काही महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबरच्या हप्त्यासोबत एकत्र मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
ज्या महिलांना अद्याप हप्ता मिळालेला नाही त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही. आधार-बँक लिंक, अर्जाची स्थिती योग्य असल्यास हप्ता आपोआप जमा होईल. अधिकृत घोषणा झाल्यानंतर संपूर्ण स्पष्ट माहिती समोर येणार आहे.
Batmi Care 27 वर आम्ही तुम्हाला या योजनेशी संबंधित प्रत्येक ताजी आणि अधिकृत अपडेट वेळेवर देत राहणार

