मोठी बातमी : फेब्रुवारीतच लाडक्या बहिणींना साडेचार हजार रुपये मिळणार, नोव्हेंबर-डिसेंबरचे रखडलेले पैसे एकत्र
Batmi care 27/Amit patil
फिजिकल व्हेरिफिकेशन कसे होणार?
महत्त्वाची बाब म्हणजे आता फिजिकल व्हेरिफिकेशन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ही प्रक्रिया:
अंगणवाडी सेविका
किंवा अधिकृत शासकीय कर्मचाऱ्यांमार्फत
केली जाणार आहे. त्यामुळे महिलांनी घाबरून न जाता आपल्या गावातील किंवा वॉर्डमधील अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधावा, असा सल्ला देण्यात येत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून अनेक लाभार्थी महिलांचे पैसे तांत्रिक अडचणी, ई-केवायसी अपूर्ण असणे, बँक खात्याशी संबंधित त्रुटी, आधार लिंक नसणे किंवा अर्जातील माहिती चुकीची असल्यामुळे रखडले होते. यामुळे अनेक महिलांमध्ये नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता सरकारकडून या सर्व अडचणी दूर करण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

