महाराष्ट्र राज्य

सरपंच सौ. राधाबाई दादासाहेब भागडे यांचा ‘अग्रगण्य सरपंच महासंमेलनात’ सन्मान
भगतवाडी/गुलमरवाडी : ग्रामविकासाच्या विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान देत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या भगतवाडी-गुलमरवाडीच्या सरपंच सौ. राधाबाई दादासाहेब भागडे यांचा पुणे येथे आयोजित ‘अग्रगण्य सरपंच महासंमेलन २०२६’ या विशेष कार्यक्रमात गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.
शुक्रवार, दि. ३१ जुलै २०२६ रोजी पुणे येथील डेक्कन कॉलेज सभागृहात ‘जागर शाश्वत कृषी अन् ग्रामविकासाचा’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामविकास, शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण तसेच गावाच्या विकासात सरपंचांची भूमिका या विषयांवर कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमात सौ. राधाबाई दादासाहेब भागडे यांच्या ग्रामविकासातील योगदानाची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला. हा सत्कार भगतवाडी व गुलमरवाडी गावासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.
सत्कारानंतर बोलताना सौ. राधाबाई भागडे यांनी, “गावाच्या विकासासाठी मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी असून, यापुढेही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करत राहीन,” अशी भावना व्यक्त केली.
त्यांच्या या सन्मानाबद्दल ग्रामस्थ, महिला बचत गट, विविध संस्था व पदाधिकारी तसेच नागरिकांकडून सौ. राधाबाई दादासाहेब भागडे यांचे अभिनंदन होत आहे.




